गावाची ग्रामपंचायत

ग्रुप ग्रामपंचायत वसोली कार्यक्षेत्रातील वसोली,आंजिवडे,उपवडे व साकीर्डे हे महसूल गाव महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. ग्रुप ग्रामपंचायत वसोली हि ग्रामपंचायत तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 45 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे – 65 किमी अंतरावर स्थिती आहे. ग्रुप ग्रामपंचायत वसोली कार्यक्षेत्रामध्ये वसोली,उपवडे , आंजिवडे साकिर्डे अशी एकुण 4 गावे या गावामध्ये एकुण - 23 वाड्या आहेत.ग्रुप ग्रामपंचायत वसोली ची लोकसंख्या 1244 इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. ग्रुप ग्रामपंचायत वसोली कार्यक्षेत्रामध्ये 05 पाच प्राथमिक शाळा आहेत.तसेच 1 माध्यमिक शाळा आहे . गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 7 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 3 कर्मचारी आहेत.